महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचे (डिसेंबर २०२५) विश्लेषणात्मक अध्ययन: विशेष संदर्भ-वाशिम जिल्हा

Subject:Public Administration\Public Policy
Title:महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचे (डिसेंबर २०२५) विश्लेषणात्मक अध्ययन: विशेष संदर्भ-वाशिम जिल्हा
Author(s):डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर
Published on:30th May 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 7
Pages:46-56
Original DOI (if any):10.5281/zenodo.20391312
Repository DOI: 
Abstract:स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया असून नगरपरिषद या शहरी प्रशासनाच्या महत्त्वाच्या घटक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या भारतीय लोकशाहीचा कणा मानल्या जातात. शहर व निमशहरी भागातील नागरी प्रशासन थेट जनतेच्या सहभागातून चालवण्यासाठी नगरपरिषद निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात. डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांनी शहरी राजकारणातील बदलती राजकीय प्रवृत्ती स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायती सहभागी झाल्या. एकूण ६,८५९ नगरसेवक पदे व २८८ नगराध्यक्ष पदे या निवडणुकांद्वारे भरली गेली आहेत. प्रस्तुत संशोधन प्रबंधामध्ये महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला असून, वाशिम जिल्ह्याच्या विशेष संदर्भात पक्षनिहाय कामगिरी, मतदार सहभाग व निवडणूक निकालांचे सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचा अभ्यास करणे व वाशिम जिल्ह्यातील निवडणुकांचे सखोल विश्लेषण करणे हा आहे.
Keywords:नगरपरिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था, वाशिम जिल्हा, सांख्यिकीय विश्लेषण, मतदार वर्तन, नगरपरिषद रचना, नगरपरिषद अध्यक्ष, निवडणूक.
 Download PDF

Leave a Reply