प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी

Subject:Public Administration/Public Policy
Title:प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी
Author(s):प्रा. संजय संदिपान चव्हाण
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:597-602
Original DOI (if any):10.5281/zenodo.18848905
Repository DOI: 
Abstract:शासन सार्वजनिक व खाजगी संस्था, औद्योगिक मंडळे, कारखाने, संघटना इत्यादी क्षेत्रांमध्ये घेतलेले निर्णय, आखलेले ध्येय, धोरणे, योजना, नियम व कायदे यांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासनाची स्थापना केलेली असते. प्रशासन म्हणजे, “अधिकार स्वरूपात श्रेणीबद्ध केलेली कार्य विभागणी होय.” प्रशासनाच्या कार्यातून शासन सार्वजनिक व खाजगी संस्था, कारखाने, मंडळे यांच्या ध्येय व उद्दिष्टांची पूर्तता होते. तसेच नागरिक, समाज, समुदाय, राज्य, राष्ट्र यांचा विकास घडवून येतो. याकरिता पारदर्शक व जबाबदार प्रशासनाची आवश्यकता असते. पारदर्शक प्रशासनामध्ये नागरिकांना आवश्यक ती माहिती प्रदान करणे, कार्यात तत्परता, यथार्थ निर्णय, गतिशील कार्य या घटकांचा समावेश होतो. तर जबाबदार प्रशासनामध्ये योग्य निर्णय, कार्यावर नियंत्रण, कार्य नियोजन, कार्याची अंमलबजावणी या घटकांचा समावेश होतो. अशा पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाद्वारे शासन, संस्था, मंडळे, संघटना यांची ध्येय, धोरणे, उद्दिष्टे साध्य होतात. तसेच समाज, समुदाय, राज्य, राष्ट्र यांचा विकास घडवून येतो. या दृष्टिकोनातून प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी महत्त्वाची आहे.
Keywords:Not available
 Download

Leave a Reply