| Abstract: | जनकल्याणकारी राष्ट्र निर्मिती करिता प्रभावी प्रशासन आणि सुशासन महत्त्वाचे असते. प्रशासनाच्या कार्यातून शासनाच्या विकासात्मक योजना, विकासाची धोरणे, नियोजन आणि अमलबजावणी पूर्णत्वास येते. शासनाची ध्येय धोरणे साध्य होतात. नागरिकांना शासकीय विकास योजनांचा लाभ मिळतो. निर्धारित लाभधारकांना विकास योजना मिळतात. प्रशासन हे नागरिक आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. प्रभावी शासनाच्या कार्यावर शासनाच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी होते. तसेच नागरिक, समाज, समुदाय यांचा विकास घडवून येतो. समाज, समुदाय, राज्य, राष्ट्र यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सुशासन महत्त्वाचे असते. सुशासन म्हणजे सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करून विकास कार्याचे आयोजन, नियोजन आणि अंमलबजावणी करणारे शासन होय. सुशासनात लोकशाही, सत्ता विकेंद्रीकरण, नागरिकांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग समाविष्ट असतो. सुशासन नागरिक, समाज, समुदाय यांच्यामध्ये समता, न्याय आणि समतोल विकास करण्याचे कार्य करते. प्रशासन व शासन यांच्या कार्यात पारदर्शकता, तत्परता, कार्यपूर्ती करते. शासन व प्रशासनात ई-गव्हर्नन्स, डिजिटल लायजेशन, तांत्रिक सेवा सुविधा यांचा अवलंब करून भ्रष्टाचार, वशिलेबाजी, विलंब यांचे निर्मूलन केले जाते. यातून जनकल्याणकारी शासन व प्रशासन प्रबळ बनते. |