आधुनिक जीवनशैली आणि कुटुंब–विवाह संस्थेतील बदल

Subject:Sociology/Psychology
Title:आधुनिक जीवनशैली आणि कुटुंब–विवाह संस्थेतील बदल
Author(s):प्रा. डॉ. शशिकांत दत्तोपंत परळकर
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:413-418
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844165
Repository DOI: 
Abstract:प्रस्तुत शोधनिबंधात 21व्या शतकातील आधुनिक जीवनशैली आणि कुटुंब–विवाह संस्थेतील बदल आणि या अनुषंगाने होत असलेल्या परिवर्तनाची चिकित्सा याचे अध्ययन करण्यात आले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे भारतीय समाजात कुटुंब व विवाह या मूलभूत सामाजिक संस्थांमध्ये लक्षणीय बदल घडून आले आहेत. औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा प्रसार, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, जागतिकीकरण तसेच माहिती–तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे पारंपरिक संयुक्त कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त व एकल कुटुंबांची संख्या वाढत आहे. कुटुंबातील भूमिका व नातेसंबंध अधिक समतावादी व लवचिक होत असून निर्णयप्रक्रियेत स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. विवाह संस्थेतही बदल दिसून येत असून विवाहाचे वय वाढणे, प्रेमविवाहांचे प्रमाण वाढणे, घटस्फोट व सहजीवनासारख्या नव्या प्रवृत्ती उदयास येत आहेत. या बदलांचे काही सकारात्मक परिणाम जसे वैयक्तिक स्वातंत्र्य, भावनिक सुसंगती व समानतेची जाणीव तर काही नकारात्मक परिणाम जसे कुटुंबीय ऐक्याचा ऱ्हास, वृद्ध व बालसंरक्षणाचे प्रश्न आणि मानसिक ताणतणाव समोर येत आहेत. या संशोधनाचा उद्देश आधुनिक जीवनशैलीचा कुटुंब–विवाह संस्थांवर होणारा एकूण परिणाम अभ्यासून परंपरा व आधुनिकता यांतील संतुलन अधोरेखित करणे हा आहे.
Keywords:आधुनिक जीवनशैली,  कुटुंब संस्था, विवाह संस्था, सामाजिक बदल, संयुक्त कुटुंब, विभक्त कुटुंब, घटस्फोट, सहजीवन, स्त्री-पुरुष समानता, भारतीय समाज
 Download

Leave a Reply