जनादेश ते वैयक्तिक निवड: भारतीय कुटुंब संस्थेचे मानसशास्त्रीय संक्रमण

Subject:Psychology/Sociology
Title:जनादेश ते वैयक्तिक निवड: भारतीय कुटुंब संस्थेचे मानसशास्त्रीय संक्रमण
Author(s):प्रो.डॉ.शेषराव राठोड  & प्रो.डॉ.रेवणनाथ काळे
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:519-522
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844655
Repository DOI: 
Abstract:भारतीय इतिहासात संयुक्त कुटुंब हे केवळ राहण्याचे ठिकाण नव्हते,तर ती एक ‘सामाजिक विमा’ व्यवस्था होती. जिथे अनाथ,विधवा आणि वृद्धांना आपोआप संरक्षण मिळत असे.वर्तमान भारतीय कुटुंब व्यवस्थेचा प्रवास केवळ संयुक्त कुटुंब ते विभक्त कुटुंब असा नाही तर विभक्त कुटुंबातही विविध आणि जटील उप-प्रकार विकसित होत आहेत. हा बदल पारंपारिक संयुक्त कुटुंब ते मुले नसलेले दुहेरी-उत्त्पन्न कुटुंब,समलिंगी कुटुंब आणि सावत्र कुटुंबासारख्या आधुनिक संरचानाकडे झालेला दिसून येतो. या विघटनाला केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि मानसिक कारणेही जबाबदार आहेत. आज भारतीय कुटुंब धार्मिक कर्तव्यांनी परिभाषित प्रत्येकाने मुल जन्माला घालावेच या पारंपारिक”जनादेश” पासुन आज उच्च शिक्षित नोकरदार कुटुंब मुल जन्माला न घालण्याच्या दिशेने जात आहे.आज महिला आणि पुरुष दोघेही पाहिल्या जोडीदारापासून मुल असल्यानंतरही पुनर्विवाह करुण नवीन कुटुंबाची निर्मिती करत आहेत.LGBTQIA+ आणि DINK कुटुंबे कुटुंबाच्या पारंपारिक परिभाषांना छेद देत,जैविक किंवा कायदेशीर संबंधांपेक्षा भावनिक बंध आणि वचनबद्धतेवर भर देतात.DINKsने,”वारसा” म्हणजे केवळ मुल जन्माला घालणे एवढेच नाही तर ते यशस्वी करिअर आणि जपलेले नातेसंबंध या स्वरूपात देखील असू शकतो तसेच “संयुक्तता” एकाच छताऐवजी भावनिक आणि आर्थिक परस्परावलंबनाने वाढवता येते हे परिभाषित केले आहे.
Keywords:DINK, LGBTQIA+, सावत्रकुटुंब, सामाजिक विमा, निवडलेले कुटुंब
 Download

Leave a Reply