ग्रामीण विकासात कृषी अर्थव्यवस्थेची भूमिका: आव्हाने आणि संधी

Subject:Economics/Development Studies
Title:ग्रामीण विकासात कृषी अर्थव्यवस्थेची भूमिका: आव्हाने आणि संधी
Author(s):डॉ. विठ्ठल शंकरराव फुलारी
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:488-495
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844501
Repository DOI: 
Abstract:भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासप्रक्रियेत कृषी क्षेत्राचे योगदान ऐतिहासिकदृष्ट्या आणि समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. ग्रामीण भारताचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पाया मोठ्या प्रमाणावर कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ, अन्नसुरक्षा, दारिद्र्यनिर्मूलन तसेच शाश्वत विकास या सर्व बाबींमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक आहे. प्रस्तुत संशोधन निबंधात ग्रामीण विकासाच्या संदर्भात कृषी अर्थव्यवस्थेची भूमिका, तिच्यासमोरील संरचनात्मक व संस्थात्मक आव्हाने आणि भविष्यातील संधी यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास दुय्यम साधनसामग्रीवर आधारित असून वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. अभ्यासातून असे दिसून येते की तांत्रिक नवकल्पना, योग्य शासकीय धोरणे व संस्थात्मक सुधारणा यांच्या माध्यमातून कृषी अर्थव्यवस्था ग्रामीण विकासाचा प्रभावी आधारस्तंभ ठरू शकते.
Keywords:कृषी अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास, रोजगार, अन्नसुरक्षा, शाश्वत विकास
 Download

Leave a Reply