| Abstract: | प्रस्तुत शोधनिबंध महाराष्ट्रातील मराठवाडा या प्रादेशिक विभागाच्या कृषी अर्थव्यवस्थेचे सर्वांगीण विश्लेषण करतो. मराठवाडा हा भौगोलिकदृष्ट्या अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने येथील शेती प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर आणि उपलब्ध भूजलावर अवलंबून आहे. गेल्या दोन दशकांत या प्रदेशातील पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाले असून, ज्वारी-बाजरीसारख्या पारंपरिक पिकांची जागा सोयाबीन, कापूस आणि ऊस या नगदी पिकांनी घेतली आहे. या शोधनिबंधात सिंचनाची अपुरी उपलब्धता, वारंवार पडणारा दुष्काळ, शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा परतावा यांचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनाअंती असे दिसून येते की, मराठवाड्याची कृषी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केवळ सिंचन प्रकल्प पुरेसे नसून, सूक्ष्म सिंचन , कृषी प्रक्रिया उद्योग आणि हवामानावर आधारित पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हा निबंध या प्रदेशातील शेतकरी आत्महत्या आणि वाढता कर्जबाजारीपणा यांसारख्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांवरही प्रकाश टाकतो. |