| Abstract: | पृथ्वीवरील पर्यावरणाची अवस्था पाहिली तर हवामान बदल, तापमान वाढ या प्रक्रिया धोकादायक पद्धतीने गतिमान झालेल्या दिसतात. हिमनग वितळणे, महासागरातील प्रवाळ परिसंस्थांचे अस्तित्व संकटात येणे, समुद्राची पातळी वाढणे याबाबतची माहिती सातत्याने पुढे येत आहे.बदलते हवामान हे जागतिक तापमान वाढ, अनिश्चित पाऊस, दुष्काळ आणि पूर यांसारख्या भीषण आव्हानांना आमंत्रण देत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे, वृक्षारोपण करणे, अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे आणि शाश्वत जीवनशैली (उदा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर) अवलंबणे यांसारख्या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत.या उपाययोजना आता जगापुढे येऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत. लोकसंख्या वाढ, शहरीकरण व औद्योगिकीकरण, गरिबी, वाढती वाहने, विकासासाठी स्पर्धा असे त्यांचे सर्वसाधारण स्वरुप आहे. |