स्त्रीवाद : मार्क्सवादोत्तर  आणि वसाहतवादोत्तर  अवलोकन

Subject:Political Science
Title:स्त्रीवाद : मार्क्सवादोत्तर  आणि वसाहतवादोत्तर  अवलोकन
Author(s):प्रा. (डॉ.) संजय पंढरीनाथ गायकवाड
Published on:30th September 2025
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 2, Issue: 4
Pages:120-127
Original DOI (if any):10.5281/zenodo.17227881
Repository DOI: 
Abstract:स्त्रीवाद, मार्क्सवाद, नवमार्क्सवाद आणि पोस्टमार्क्सवाद यांचा अभ्यास हा सामाजिक-राजकीय बदल समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्त्रीवादाची मुळे प्राचीन काळात आढळतात, मात्र 18-19 व्या शतकात पश्चिम व भारतीय समाजात स्त्रियांच्या समान हक्कांसाठी ठोस चळवळी सुरू झाल्या. उदारमतवादी, समाजवादी, मूलगामी व उत्तर-आधुनिक अशा विविध प्रवाहांमधून स्त्रीवादाने समानतेचा पुरस्कार केला आहे. आंतरराष्ट्रीय विचारवंत मेरी ऑल्स्टोनक्राफ्ट, सिमोन द ब्युवोआर, बेट्टी फ्रीडन यांनी स्त्रीवादी विचारांना शास्त्रीय अधिष्ठान दिले, तर भारतात फुले, ब्राह्मो समाज यांचा ऐतिहासिक ठसा उमटला. स्वातंत्र्यानंतर शिक्षण, रोजगार, समान वेतन, आरोग्य व राजकीय सहभागासाठी अनेक कायदे करण्यात आले तरीही ग्रामीण व मागास भागात असमानता टिकून आहे. मार्क्सवादी स्त्रीवाद वर्ग, पितृसत्ता व भांडवलशाही यांमधील संबंधांचा पर्दाफाश करतो व सामाजिक क्रांतीला आवश्यक मानतो. महिलांच्या शिक्षणामुळे सामाजिक व आर्थिक स्वावलंबन साधले गेले. त्यानंतर विकसित झालेला नवमार्क्सवाद वर्ग संघर्षाबरोबर संस्कृती, विचारधारा, राज्यसत्ता यांचे विश्लेषण करतो. पोस्टमार्क्सवाद मात्र वर्गाच्या पलीकडे जात लिंग, जात, वंश, भाषा इत्यादी घटकांच्या अस्मिता व ओळखीवर आधारित बहुलवादी लोकशाहीची संकल्पना मांडतो. भारतीय संदर्भात जात, धर्म, लिंग या मुद्द्यांमुळे पोस्टमार्क्सवादाला नवीन सामाजिक व राजकीय संदर्भ देत अस्मिताधारित चळवळींना बळ मिळाले. अशा रीतीने स्त्रीवाद, मार्क्सवाद, नवमार्क्सवाद आणि पोस्टमार्क्सवाद यांद्वारे समाजातील विषमता व शोषणाला आव्हान देणारी वैचारिक परंपरा सतत विकसित होत गेली आहे.
Keywords:स्त्रीवाद, मार्क्सवादोत्तर, वसाहतवादोत्तर, फेमिनिझम
 Download PDF

Leave a Reply