| Abstract: | अन्न, वस्त्र,निवारा,आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करण्याच्या शोधात माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो.पृथ्वीवरील सर्व प्राणी व पक्ष्यांसह जवळजवळ सर्वच जीव असे परिभ्रमण करत आपले पोट भरत असतात. भारत हा खेड्याचा देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये 6 लाखापेक्षा अधिक खेडे असून ग्रामीण भागात अनेकदा शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, आरोग्य सुविधांचा अभाव, रोजगाराच्या संधीची कमतरता आणि इतर घटकांसारख्या मूलभूत गरजांची कमतरता दिसते. ग्रामीण भागात गरीब लोकांचे कामासाठी स्थलांतर होते यामुळे शहरात लोकसंख्या वाढते त्यामुळे तेथे अनेक समस्या निर्माण होतात. उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्य सुविधांमुळे ग्रामीण जीवनशैलीकडून शहरी जीवनशैलीकडे स्थलांतर होते. ग्रामीण स्थलांतर आणि नागरीकरण हे एकमेकांशी घट्ट जोडलेले असून, चांगल्या रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि नैसर्गिक आपत्ती तसेच आरोग्य सुविधांच्या शोधात ग्रामीण भागातून लोक शहराकडे स्थलांतरित होतात ग्रामीण भागातून लोक शहराकडे स्थलांतरित होतात. या प्रक्रियेमुळे शहरी लोकसंख्येचा घनता वाढते आणि शहरांचा विस्तार होतो, परिणामी पायाभूत सुविधांवर ताण येऊन झोपडपट्ट्या व प्रदूषणासारख्या समस्या निर्माण होतात. सदरील संशोधन करण्यासाठी संशोधकाने पुस्तके. वर्तमान पत्रे,वेब साईट इ. दुय्यम साधनसामग्रीचा आधार घेतला आहे. |