राजकीय समाजशास्त्रात सोशल मीडियाची भूमिका: लोकशाही सहभाग, ध्रुवीकरण आणि समकालीन स्थितीतील परिवर्तन

Subject:Political Science/Sociology/Media Studies
Title:राजकीय समाजशास्त्रात सोशल मीडियाची भूमिका: लोकशाही सहभाग, ध्रुवीकरण आणि समकालीन स्थितीतील परिवर्तन
Author(s):डॉ. भगवान सुरेश मनाळ
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:717-726
Original DOI (if any):10.5281/zenodo.18849593
Repository DOI: 
Abstract:प्रस्तुत लघुशोध निबंधाच्या माध्यमातून राजकीय समाजशास्त्र (Political Sociology) या समाजशास्त्राच्या शाखेच्या विषयामध्ये समाजात सद्य स्थितीतील एक अविभाज्य घटक बनलेल्या सोशल मीडियाच्या (social media) समकालीन भूमिकेचे सखोल विश्लेषण केले असून यातून सामजिक परिवर्तनाचा हा एक भाग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंटरनेटच्या आधारे स्मार्टफोनच्या माध्यमातून  वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे, सोशल मीडिया हे आता केवळ एक संवादाचे  साधनच राहिले नसून ते आता राजकीय क्रिया आणि प्रतिक्रियेचे, राजकीय शक्तीचे  आणि सामाजिक क्रियाकलापाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश सद्यस्थितीत सोशल मीडियामुळे समाजातील राजकीय प्रक्रियेतील भारतीय लोकशाही प्रक्रिया, नागरिकांच्या सहभागावर आणि राजकीय ध्रुवीकरणावर (Polarization) झालेल्या परिणामांचे आणि त्यातील परिवर्तनाचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून परीक्षण करणे आहे. ​प्रस्तुत लघुशोध निबंधाच्या माध्यमातून भारतीय ग्रामीण तसेच शहरी नागरिकांच्या राजकीय क्रीयाकालापातील सहभागाचे प्रमाण आणि जनतेचा राजकीय दृष्टीकोन यातील सोशल मीडियाची महत्वाची भूमिका यामुळे होत असलेले परिवर्तन याचा अभ्यास समाविष्ट केला आहे. तसेच सोशल मीडियाच्या नकारात्मक भूमेकेचे पैलू जसे, खोट्या बातम्या (Fake News), अपप्रचार (Misinformation), इको चेंबर्स (Echo Chambers) आणि राजकीय द्वेषपूर्ण भाषणांमुळे (Hate Speech) समाजात वाढणारे विभाजन आणि अविश्वास या गंभीर नकारात्मक परिणामांवरही लक्ष केंद्रित केले आहे. ​प्रस्तुत संशोधनात गुणात्मक (Qualitative) आणि संख्यात्मक (Quantitative) अशा मिश्र संशोधन आराखड्याचा (Mixed-Method Approach) वापर केला गेला असून, ज्यामध्ये विशिष्ट सामाजिक-राजकीय घटनांचा अभ्यास केला जातो. प्रस्तुत लघु शोध निबंधाच्या शोध समस्येच्या आकलनासाठी प्रमुख संशोधन उद्दिष्टे आणि त्यांना अनुसरून गृहीतके मांडली आहेत. निष्कर्षांमध्ये हे सिद्ध केले आहे की सोशल मीडिया एक दुधारी तलवार (Double-Edged Sword) असून, ते लोकशाही बळकट करू शकते, परंतु त्याच वेळी ते सामाजिक तणाव (Social Tension) वाढवू शकते. या लघुशोध निबंधाच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता (Digital Literacy) वाढवणे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करणे आणि ते वापरण्यासंदर्भातील पारदर्शक नियमने  करणे यांसारख्या आवश्यक उपाययोजना आणि शिफारशी मांडल्या आहेत. ज्यामुळे सोशल मीडियाचा वापर भारतीय राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने, भारतीय लोकशाही आणि एकूणच  सामाजिक सलोख्यासाठी सकारात्मक पद्धतीने करता येईल.
Keywords:राजकीय समाजशास्त्र, सोशल मीडिया, ध्रुवीकरण (Polarization), लोकशाही सहभाग, फेक न्यूज
 Download

Leave a Reply